पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सूरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशामक दलाच्या ४० गाड्या दाखल

सूरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग (ANI)

गुजरातमध्ये सूरत येथील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. परंतु, कोट्यवधी रुपयांचे यात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

सूरतमध्ये रघुवीर मार्केट नावाची १४ मजली इमारत आहे. या इमारतीत कापड व्यापार मोठ्याप्रमाणात चालतो. पहाटे ४ च्या सुमारास आग लागल्याचे सांगण्यात येते. ही आग इमारतीच्या ७ व्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. 

...म्हणून 'टुकडे-टुकडे गँग' या वक्तव्यामुळे अमित शहा अडचणीत सापडणार

सारोली परिसरातील या मार्केटमध्ये १५ दिवसांपूर्वीही आग लागल्याचे सांगण्यात येते. आगीमुळे ५० हून अधिक दुकाने भस्मसात झाल्याचे बोलले जाते. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.