पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड १९ : रॅपिड डायग्नॉस्टिक टेस्टची नियमावली शनिवारी जाहीर होणार

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे सहसचिव लव आगरवाल (फोट - एएनआय)

कोविड १९ चाचणी आणखी वेगवान करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी एँटिबॉडी टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. या चाचण्या नक्की कुठे आणि कोणावर केल्या जाव्यात यासाठी शनिवारीच नियमावली जारी करण्यात येईल, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले. एँटिबॉडी टेस्ट अर्थात रॅपिड डायग्नॉस्टिक टेस्टच्या माध्यमातून आवश्यक रुग्णांची पुढील पीसीआर चाचणी करणे शक्य होईल. पीसीआर चाचणीमधून कोरोनाची लागण झाली आहे, हे स्पष्ट होत असते. पीसीआर चाचणीच्या तुलने एँटिबॉडी टेस्टचे निकाल लवकर येतात. त्यासाठी केंद्र सरकारने या चाचणीला मंजुरी दिली. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या भागात या चाचण्या घेण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

दिलासादायक! मुंबईतील कोरोनाबाधित बाळासह आईचा रिपोर्ट निगेटिव्ह

निजामुद्दिन येथील मरकजमधील तबलिगी जमातच्या सदस्यांना देशात वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरण पद्धतीने ठेवले गेले आहे. यापैकी काही जणांकडून तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक केली जात असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने अशी गैरवर्तणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत. देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ६४७ रुग्ण हे तबलिगी जमातच्या कार्यक्रमातून आलेले सदस्य आहेत. वेगवेगळ्या १४ राज्यांमध्ये हे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांनी सांगितले.

... तर पोलिसांच्या कुटुंबियांना मिळणार ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान

देशात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची लागण झाल्याची ३३६ प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे एकूण रुग्णांची संख्या २३०१ झाली आहे. त्याचवेळी ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १२ जणांचा मृत्यू गुरुवारीच झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.