पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताच्या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांशी पाकचे असभ्य वर्तन

भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया

पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव काही अंशी कमी होताना दिसत असतानाच पाकने पुन्हा एकदा खोडी काढली आहे. इस्लामाबाद येथील भारतीय दुतावासाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांना पाक प्रशासनाने आत जाण्यापासून रोखले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी यंत्रणांनी हॉटेल सेरेना येथे आयोजित करण्यात आलेली इफ्तार पार्टीचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. शनिवारी आयोजित पार्टीत आलेल्या शेकडो पाहुण्यांना परत पाठवण्यात आले. इतकेच नाही तर त्यांनी पाहुण्यांबरोबर असभ्य वर्तनही केले.

पाक यंत्रणांनी भारतीय उच्चायुक्ताच्या पाहुण्यांचा अपमान करत त्यांना फोनवर धमकीही दिली. पाक यंत्रणांनी पाहुण्यांना गोपनीय क्रमांकावरुन फोन केला आणि भारताने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत सहभागी झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच दिली. 

पाक प्रसारमाध्यमातही मोदींची चर्चा, 'वो है तो मुमकिन है!'

यावर पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्या ज्या पाहुण्यांना परत पाठवण्यात आले आहे. त्या सर्वांची मी माफी मागतो. पाक यंत्रणांची ही कृती अत्यंत निराशाजनक आहे. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी फक्त कूटनीतीक प्रोटोकॉलचेच उल्लंघन केलेले नाहीतर त्यांनी असभ्य वर्तनही केले आहे. याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम पडेल,' असा इशाराही त्यांनी दिला. 

...म्हणून बालाकोटचा हल्ला केला, लष्कर प्रमुखांची प्रतिक्रिया

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिम्सटेक देशातील राष्ट्राध्यक्षांना शपथविधीस बोलावले होते. पण पाकिस्तानला यापासून दूर ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्यानंतर त्यांना दहशतवाद मुक्त वातावरण ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

राफेल ताफ्यात दाखल होताच पाकवर भारी ठरू - हवाई दलप्रमुख