पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आप नगरसेवकावरील आरोपावर केजरीवालांचे मौन धोकादायक: गौतम गंभीर

गौतम गंभीर

आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यावर दिल्ली हिंसाचारावेळी गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अंकित शर्मा यांच्या हत्येवर अरविंद केजरीवालांच्या गप्प राहण्यावर गौतम गंभीर यांनी सवाल उपस्थित केला आहे. केजरीवालांचे मौन धोकादायक असल्याचे गौतम गंभीरने सांगितले.

 

'चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांवर FIR दाखल करण्याची ही वेळ नाही'

गौतम गंभीर यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'आयबी अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह नाल्यात फेकणे, दंगलखोरांना घरात आश्रय देणे आणि पेट्रोल बॉम्ब टाकणे असे आरोप एका प्रतिनिधीवर करण्यात आले आहेत. हे आरोप सिद्ध झाल्यास ताहिर हुसेनला न जनता माफ करेल, न कायदा आणि न देव माफ करेल. अरविंद केजरीवालांचे मौन धोकादायक आहे.'

केंद्र आणि दिल्ली सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली - काँग्रेस

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान दिल्लीत हिंसाचार झाला. अंकित शर्माच्या कुटुंबीयांनी आपचे नगरसेवक ताहिर हुसेन यांनी हिंसाचारा दरम्यान अंकितची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी असे सांगितले की, 'हिंसाचाराच्या दिवशी ताहिस हुसेन आणि त्यांचे समर्थक अंकितला उचलून घेऊन गेले होते. त्यांनी अंकितची हत्या केली त्यानंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला.' दरम्यान, अंकीत यांच्या कुटुंबियांनी केलेले आरोप खोटे असल्याचा दावा ताहिर हुसेन यांनी केला आहे.  

T-20 WC: हॅटट्रिकसह भारतीय महिलांनी दिमाखात गाठली