पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आर्थिक आघाडीवर धक्का, सप्टेंबरमध्ये जीएसटी वसुलीत ६ हजार कोटींची तूट

जीएसटी

वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) वसुलीत ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये सुमारे ६ हजार कोटींची घसरण झाली आहे. ऑगस्टमध्ये ९८,२०२ कोटी रुपयांचा जीएसटी वसूल करण्यात आला होता. तर सप्टेंबरमध्ये तो घटून ९१,९१६ कोटी रुपयांपर्यंत आला आहे.

गेल्यावर्षी याच कालावधीत ९४,४४२ कोटी रुपयांचा जीएसटी वसूल करण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा त्यात २.६७ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या १९ महिन्यातील सर्वांत कमी संकलन आहे.

यावर्षी एप्रिल, मे आणि जुलैमध्ये ही रक्कम एक-एक लाख कोटी रुपयांहून अधिक होती. जूनमध्ये ती सुमारे एक लाख कोटी रुपये झाली होती. ऑगस्टमध्ये ही रक्कम ९८,२०२ कोटी रुपये झाली.

आश्रितांना राहू देऊ आणि घुसखोरांना हाकलू - अमित शहा

अर्थ मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, सप्टेंबरमध्ये संकलित झालेल्या जीएसटीमध्ये केंद्रीय जीएसटी संकल १६,६३० कोटी रुपये, राज्य जीएसटी संकलन २२,५९८ कोटी, एकीकृत जीएसटी संकलन ४५,०६९ कोटी आणि उपकर संकलन ७,६२० कोटी रुपये आहे. एकीकृत जीएसटीमध्ये २२,०९७ कोटी रुपये आणि उपकरातून ७२८ कोटी रुपये आयातीतून मिळाले आहेत.

ऑगस्ट महिन्यात ३० सप्टेंबरपर्यंत ७५ लाख ९४ हजार जीएसटीआर-३ बी अर्ज भरण्यात आले.

सरकारने एकीकृत जीएसटीतून २१,१३१ कोटी रुपये केंद्रीय जीएसटी आणि १५,१२१ कोटी रुपये राज्य जीएसटीच्या खात्यात हस्तांतरित केले आहेत. नियमित वाटपानंतर जूनमध्ये केंद्र सरकारचे एकूण जीएसटी महसूल ३७,७६१ कोटी रुपये आणि राज्यातील एकूण रक्कम ३७,७१९ कोटी रुपये राहिले आहे.

विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रो प्रयत्नशील