पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवरदेव वरात घेऊन आला मात्र नवरीला दुसराच घेऊन पळाला

प्रातिनिधिक छायाचित्र

छोट्या छोट्या गोष्टी आता नात्यामध्ये मोठी दरी उभी करत आहे. अशीच घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये घडली आहे. वरातीमध्ये नवऱ्या मुलाचे नातेवाईक फोटोग्राफर आणि बँडवाल्यांना घेऊन न आल्यामुळे नवरी मुलीचे नातेवाईक संतापले. त्यांनी लग्नासाठी आलेले नवऱ्यामुलाचे वऱ्हाड विना नवरीचे परत तसेच पाठवले. जनपदच्या जहांगिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावामध्ये ही घटना घडली आहे. या गावातील गौतमबुध्दनगरमध्ये लग्न होते. वादावादीनंतर वर पक्ष आणि वधु पक्षामध्ये या विषयावर तासभर बैठक झाली. मात्र त्यामधून काहीच निष्कर्ष न निघाल्यामुळे वऱ्हाड पुन्हा पाठवण्यात आले. तर नवरी मुलीचे लग्न अमरगढ क्षेत्रातील दुसऱ्या तरुणाशी लावून देण्यात आले. 

पुणेः भाजप नगरसेवकाच्या कार्यालयासमोर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

गौतमबुध्दनगरमधील एका तरुणीचे दादरी येथील एका गावातील तरुणासोबत लग्न ठरले होते. रविवारी रात्री लग्नासाठी नवऱ्या मुलाची वरात आली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11 वाजता वरात गावामध्ये पोहचली. त्यावेळी ग्रामस्थांनी पाहिले की, नवऱ्या मुलाच्या वरातीमध्ये फोटोग्राफर आणि बँडवाले नव्हते. त्यामुळे गावामध्ये वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. त्याचसोबत नवऱ्या मुलाकडून नवरीसाठी आणण्यात आलेले सामान देखील चांगले नव्हते. त्यामुळे नवरी मुलीचे नातेवाईक संतापले. त्यांनी लग्न थांबवले आणि सर्व ग्रामस्थांना बोलावून पंचायत बोलावली. जवळपास तासभर चाललेल्या या पंचायतीमधून काहीच निष्कर्ष निघाला नाही. 

पनवेलजवळ दुचाकीवरून पूल ओलांडताना एक दाम्पत्य वाहून गेले

पंचायतीमध्ये जेव्हा नवऱ्या मुलाला नवरीच्या जबाबदारीविषयी प्रश्न उपस्थित केले गेले तर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वधू पक्ष आणि वर पक्ष दोघांची समजूत काढली. तरी देखील वर पक्ष आणि वधू पक्षात सहमती झाली नाही. शेवटी नवऱ्या मुलाचे वऱ्हाड विना नवरीचेच परत गेले. त्यानंतर अमरगढ क्षेत्रातील एका गावामध्ये राहणाऱ्या तरुणाशी नवरी मुलीचे मोठ्या धुम धडाक्यात लग्न लावून देण्यात आले. 

कर्नाटकात सरकारला हलका दिलासा, ८ बंडखोरांचे राजीनामे चुकीचे लिहिलेले

जहांगिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक नरेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितेल की, 'एका गावामध्ये रविवारी रात्री लग्नासाठी नवऱ्या मुलाची वरात आली होती. मात्र वरातीमध्ये बँडवाले आणि फोटोग्राफर नसल्यामुळे वर पक्ष आणि वधु पक्षामध्ये वाद झाला. आम्ही वधु पक्ष आणि वर पक्ष दोघांची समजूत काढून घरी पाठवण्यात आले होते.'