पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाढदिवस नाही, ग्रेटाचं पर्यावरणासाठी ७ तासांचं आंदोलन

ग्रेटा थनबर्ग

वातावरणातील बदल, पर्यावरणाचा ऱ्हास, वाढतं प्रदूषण  यांसारख्या अनेक समस्यांवर दुर्लक्ष करत चाललेल्या जगातील नेत्यांना तुमची हिंमत कशी झाली?, असा रोखठोक सवाल विचारण्याचं धाडस करणाऱ्या ग्रेटाचा ३ जानेवारीला १७ वा वाढदिवस होता. स्वीडनमधीलच नाही तर जगातील सर्वात कमी वर्षांची ही धडाडीची पर्यावरणवादी कार्यकर्ती. गेल्यावर्षी आपल्या रोखठोक भाषणानं तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

इराकमधील इराण समर्थक सैनिकांवर हवाई हल्ला, ६ ठार

आता पुन्हा एकदा ग्रेटा चर्चेत आली आहे. वाढदिवस साजरा न करता ग्रेटा स्वीडनच्या संसदेबाहेर सात तास आंदोलन करत होती. वातावरणातील बदलावर अत्यंत तळमळीनं  ग्रेटा भूमिका मांडत आहे.  वातावरणातील गंभीर बदलावर तातडीनं उपाय योजले पाहिजे अन्यथा येणाऱ्या पिढीचं भविष्य धोक्यात असेल अशी सूचना वारंवार तिने दिली आहे. पर्यावरणासाठी तिनं तिच्या शाळकरी मित्रांसोबत मिळून मोहीम राबवली आहे. या मोहीमेचा भाग म्हणून शुक्रवारी ग्रेटासह अनेकांनी संसदेच्या बाहेर कडाक्याच्या थंडीतही सात तास आंदोलन केलं. 

३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा - लष्करप्रमुख

केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्यांपैकी मी नाही. आंदोलन संपल्यानंतर मी थेट घरी जाईन असं ग्रेटा थनबर्गनं सांगितलं. गेल्या वर्षभरापासून शालेय विद्यार्थी ग्रेटाचं आयुष्य पूर्णपणे व्यग्र आहे.