पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एवढा राग बरा नव्हे! त्या १६ वर्षीय तरुणीला ट्रम्प यांचा सल्ला

ग्रेटा थनबर्ग

वातावरणातील बदल, पर्यावरणाचा ऱ्हास, वाढतं प्रदूषण  यांसारख्या समस्यांबाबत जगातील नेत्यांना रोखठोक सवाल विचारणाऱ्या १६ वर्षीय ग्रेटा ग्रेटा थनबर्गला टाइम मॅग्जिनने 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केलीय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जल पर्यावरण परिषदेत आपल्या भाषणाने जगाचे लक्ष वेधणाऱ्या ग्रेटाला चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिलाय.

तुमची हिंमत कशी झाली? १६ वर्षांच्या कार्यकर्तीचा नेत्यांना सवाल

ट्रम्प  यांनी ट्विटमध्ये लिहलंय की, हे चांगले नव्हे! ग्रेटा तुझ्या रागावर नियंत्रण ठेव. शांत राहा. मित्रांसोबत एखादा चांगला जूना चित्रपट पाहा, असा उल्लेखही ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.  बुधवारी टाइम मॅग्जिनने 'पर्सन ऑफ द इयर 2019 ची घोषणा केली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी ट्विटच्या माध्यमातून ग्रेटाला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.

तिच्या 'ग्रेट' भाषणावर रोहित म्हणाला, ग्रेटा तू आमची 'प्रेरणा' आहेस

न्यूयॉर्कमधील ग्रेटाच्या भाषणानंतरही ट्रम्प यांनी ट्विट केले होते. ग्रेटाही उज्वल आणि अद्धभूत भविष्याच्या दृष्टिने विचार करणारी खूप आनंदी मुलगी आहे. तिच्याकडे पाहून आनंदी वाटले, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली होती. ट्रम्प यांच्या ट्विटनंतर ग्रेटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.