पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरमध्ये CRPF जवानांवर ग्रेनेडचा हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये CRPF जवानांवर ग्रेनेडचा हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. ही घटना श्रीनगरमधील लाल चौकातील प्रताप पार्कमध्ये घडली. हा हल्ला कोणी केला याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या हल्ल्यात दोन सामान्य नागरिक आणि दोन सुरक्षा दलांचे जवान जखमी झाले आहेत. 

नुकताच जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले होते. लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते. बारामुला येथून १९ वर्षीय शाजिद फारुख दारला अटक करण्यात आली होती. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदचा स्वयंघोषित प्रमुख कारी यासिर सह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारतीय लष्कराचे हो मोठे यश होते. पोलिस आणि लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, यासिर मागीलवर्षी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान मारले गेले होते.