पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ही तर मोदी सरकारची घोडचूक, काँग्रेसचा केंद्राच्या निर्णयावर हल्ला

काश्मीरमध्ये असलेले युरोपियन युनियनचे शिष्टमंडळ

जम्मू-काश्मिरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. केंद्रातील भाजपचे सरकार घोडचूक करीत असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाने लक्ष घालण्याची गरज नाही, हेच काँग्रेसचे आतापर्यंतचे धोरण होते. पण मोदी सरकारच्या नव्या निर्णयांनुसार त्यावर बोळा फिरवला गेला असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. जम्मू-काश्मीरमध्ये युरोपिय युनियनच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ पाठविण्याच्या निर्णयावरून काँग्रेसने ही टीका केली.

जम्मू-काश्मीर आणि लडाख आज मध्यरात्रीपासून वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुर्जेवाला यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून भाजप सरकारकडून आयोजित करण्यात आलेला अत्यंत बालिश, चुकीच्या पद्धती आखलेला कार्यक्रम भारतात पाहायला मिळतो आहे. यामध्ये युरोपियन युनियनच्या २७ खासदारांना भारतात आणले गेले. एका वादग्रस्त विचारमंचाकडून हा सर्व प्रकार घडवून आणण्यात आला. या शिष्टमंडळाला काश्मीरमध्ये जाण्यास तिथे पत्रकार परिषद घेण्यास परवानगी देण्यात आली. भाजप सरकारनेच आयोजित केलेल्या या दौऱ्यामध्ये केवळ २३ खासदारच सहभागी झाले. चार खासदार दिल्लीतून माघारी फिरले.

काश्मीर भेटीनंतर युरोपियन युनियनचे प्रतिनिधी म्हणाले...

काश्मिरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे हीच भूमिका काँग्रेस पक्षाने आतापर्यंत घेतली होती. तिसऱ्या देशाकडून किंवा संघटनेकडून या विषयात हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही, हे काँग्रेसने कायम पाळले. पण अशा पद्धतीने त्रयस्थ लोकांना काश्मीरमध्ये पाठवून मोदी सरकारने घोडचूक केली आहे. सरकारने भारतातील लोकशाही व्यवस्थेचा अपमान केला आहे. जेव्हा आपल्या देशातील खासदार काश्मिरला जातात, त्यावेळी त्यांना ताब्यात घेतले जाते आणि दिल्लीला परत पाठवले जाते. पण दुसऱ्या देशातील खासदारांसाठी मात्र सरकार पायघड्या घालते आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.