पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरः श्रीनगरमधील लाल चौकाजवळ ग्रेनेड हल्ला

जम्मू-काश्मीरः श्रीनगरमधील लाल चौकाजवळ ग्रेनेड हल्ला (ANI)

जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लाल चौकाजवळील हरिसिंह रस्त्यावर हा दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला अति सुरक्षित क्षेत्रात (हाय सिक्युरिटी झोन) झाला. हल्ल्याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. परिसरात शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. पाच नागरिक जखमी झाल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटले आहे. 

मोदी-जिनपिंग बैठकः भारताचे कूटनीतिक यश, काश्मीरवर चकार शब्द नाही

या हल्ल्यात ५ नागरिक जखमी झाले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले आहे. परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. 

दरम्यान, गेल्या ५ ऑगस्टला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले होते. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात शांतता कायम राहण्यासाठी अनेक प्रकारची बंधने घालण्यात आली आहेत. 

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या पीएची आत्महत्या