पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्रिटिश नागरिकत्वाचा मुद्दा, राहुल गांधींना नोटीस

राहुल गांधी

ब्रिटिश नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून, १५ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 'एएनआय'ने या संदर्भात ट्विट केले आहे. 

भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती काय आहे, हे १५ दिवसांत मंत्रालयाकडे स्पष्ट करावे, असे नोटिसीत म्हणण्यात आले आहे. 

दरम्यान, ही नोटीस म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपकडून खेळण्यात आलेली चाल आहे, असा आरोप काँग्रेसने केला. भाजप निवडणूक हारणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या मध्यावर त्यांच्याकडून ही राजकीय चाल खेळण्यात आली आहे. राहुल गांधी यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी म्हटले आहे.