पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... या कामांना लॉकडाऊनमधून वगळले, सरकारच्या सूचना जारी

मुंबईत लॉकडाऊन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली. त्यावेळीच त्यांनी बुधवारी या संदर्भात सविस्तर सूचना जारी करण्यात येतील, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीमध्ये कोणत्या कामांना सूट देण्यात आली आहे, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

देशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

जीवनावश्यक आणि अन्य सर्व प्रकारच्या वस्तू, अन्नधान्य यांच्या देशातील वाहतुकीला मंजुरी देण्यात आली आहे. आधी केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीलाच परवानगी देण्यात आली होती.

शेती काम, शेतमालाची वाहतूक आणि विक्री, शेतीशी संबंधित कृषि उत्पन्न बाजार समित्या या सर्वांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे.

दूध उत्पादन, दूध पुरवठा, मासेमारी, चहा, कॉफी, चहाच्या मळ्यांची कामे यांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात असणारे उद्योग. यामध्ये प्रामुख्याने अन्न प्रक्रिया, रस्ते निर्मिती, सिंचन प्रकल्प, मनरेगातील कामे यांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. ही कामे सुरू राहू शकतात.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील हार्डवेअर उत्पादन, जीवनाश्यक वस्तू आणि पॅकेजिंग यांना सूट देण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि देशातील इतर सर्व बँका, सेबी, विमा कंपन्या यांचे काम सुरू राहिल.

'कोरोनामुळे राज्यावर अर्थसंकट, बेरोजगारीचं प्रमाण वाढणार'

ई-कॉमर्स क्षेत्रातील उद्योग, माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रातील कंपन्या यांचेही काम आवश्यकतेप्रमाणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आरोग्य उत्पादने, सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा यांचेही काम किंवा उत्पादन सुरू राहणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारची महत्त्वाची कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहतील.