पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घरातून बाहेर पडणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची महत्त्वाची सूचना

सध्या लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत.

कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना घरगुती पद्धतीने तयार केलेला मास्क अवश्य वापरावा, असे सरकारने म्हटले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. पण या स्थितीत कोणाला बाहेर पडायचे असेल तर तोंड आणि नाक झाकले जाईल, असा घरगुती पद्धतीने तयार केलेला मास्क अवश्य वापरावा, असे सरकारने म्हटले आहे.

कोविड १९ : वयोवृद्ध रुग्णांवर मुंबईत केवळ मोठ्या रुग्णालयात उपचार

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या देशात २९०० च्या वर गेली आहे. तर शनिवारी सकाळपर्यंत ६८ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारकडून ही सूचना देण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या आवाहनाला नितीन राऊत यांचा आक्षेप

कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे
कोरोनाची चाचणी करणाऱ्या डायग्नोस्टिक किट्सच्या निर्यातीवर सरकारने निर्बंध घातले आहेत.

कोरोनाशी लढण्यासाठी दिल्लीतील एम्समधील सर्व कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन पंतप्रधान मदतनिधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चीनमध्ये तीन मिनिटांची स्तब्धता पाळण्यात आली.