पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात केंद्राचा मोठा खुलासा

स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 'भारतरत्न' देण्यासाठी शिफारस करण्याची गरज नाही, असा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात शिफारस करण्यात आली आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर लिखित उत्तर देताना केंद्र सरकारने आपली भूमिका मांडली. योग्य वेळी सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, अशी माहितीही सरकारकडून देण्यात आली.  

शरद पवारांच्या दिल्लीतील 'त्या' वक्तव्यामागे दडलेल्या ५ शक्यता

केंद्राकडे अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून भारतरत्न देण्यासंदर्भातील शिफारशी केल्या जातात. पण भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करायलाच हवे असे कोणतेही बंधन नाही. शिफारशी शिवाय देखील हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. भारतरत्न देण्यासंदर्भातील निर्णय योग्य वेळी घेतला जातो. असं असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आले.  

आपापसातील भांडणात दोघांचेही नुकसान, भागवतांचे सूचक वक्तव्य

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे आश्वासन दिले होते.  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका देखील मांडली होती. गेल्या काही वर्षांपासून सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत आहेय या मागणीला काँग्रेसचा विरोध आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Govt has taken steps to confer Bharat Ratna to VD Savarkar no formal recommendation for this award