पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Budget 2020: शिक्षण क्षेत्रासाठी ९९ हजार ३०० कोटींची घोषणा

अर्थमंत्री

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी ९९ हजार ३०० कोटींची तरतूद आणि कौशल्य विकासासाठी ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे. देशात शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, यासाठी नव्या शिक्षण धोरणाची घोषणा लवकरच करण्यात येईल असेही सीतारमन यांनी सांगितले.

काय आहेत महत्त्वाचे मुद्दे

- शिक्षण क्षेत्राच्या विकासावर आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीवर सरकारचा भर आहे. ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचत नाही त्यांच्यासाठी 'ऑनलाइन डीग्री योजना' सुरु करण्यात येणार आहे. ज्याद्वारे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतील.

-  तसंच, परदेशी विद्यार्थ्यांसाठी 'स्टडी इन इंडिया' योजना सुरु करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. 

-  देशात नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्वावर जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकिय महाविद्यालय जोडण्यात येणार आहे. 

- उच्च शिक्षणासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे. देशात मार्च २०२१ पर्यंत १५० उच्च शैक्षणिक संस्था सुरू करण्यात येतील. या संस्थांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल.

-  नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार.

-  या अर्थसंकल्पात राष्ट्रीय पोलिस विद्यापीठाचा प्रस्ताव करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी नवीन अभियंत्यांना संधी द्यावी, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.