पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकार व बँका कोणालाही आयुष्यातून उठवू शकतात, सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर विजय मल्ल्यांची प्रतिक्रिया

विजय मल्ल्या

कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही जी सिद्धार्थ यांचा मृतदेह बुधवारी सकाळी नेत्रावती नदीमध्ये सापडला. सोमवारी संध्याकाळपासून ते बेपत्ता होते. आर्थिक कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच आता मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी या प्रकारावरून सरकार आणि बँकांवर तोफ डागली आहे. बुधवारी केलेल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर टीका केली.

आपल्या ट्विटमध्ये विजय मल्ल्या म्हणतात, सिद्धार्थ यांना मी खूप चांगला ओळखत होतो. एक चांगला माणूस आणि अत्यंत हुशार उद्योगपती. त्यांनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर वाचून मी अस्वस्थ झालो आहे. सरकारी यंत्रणा आणि बँका कोणालाही आयुष्यातून उठवू शकता. ते माझ्याशी कसे वागताहेत हेच बघा ना. मी सर्व पैसे परत करण्यास तयार आहे. तरीही मला सूडबुद्धीने वागणूक दिली जाते आहे. 

बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या देशाबाहेर पसार झाले आहेत. त्याच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना भारताकडे प्रत्यार्पित करण्याचा खटला तेथील न्यायालयात सुरू आहे. लवकरच त्यांना भारतीय तपास पथकाच्या हवाली केले जाईल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Govt agencies banks can drive anyone to despair Devastated Vijay Mallya says on CCD founders letter