पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ममता सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याची गरज, राज्यपालांचा निशाणा

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड

लॉकडाऊन काळात सोशल डिस्टन्सिंग राखण्यात आणि धार्मिक कार्यक्रम रोखण्यात पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राज्यपाल जगदीप धनखड यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी यासाठी सरकारला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, असेही म्हटले आहे. 

... या कामांना लॉकडाऊनमधून वगळले, सरकारच्या सूचना जारी

राज्यपाल पुढे म्हणाले की, राज्यात लॉकडाऊन लागू करण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलांना तैनात करण्याबाबत विचार व्हायला हवा. लॉकडाऊनचे प्रोटोकॉल पूर्णपणे पाळले गेले पाहिजे. राज्य सरकारच्या अधीन पोलिस आणि प्रशासन लॉकडाऊनचे पालन करण्यात आणि धार्मिक कार्यक्रम रोखण्यात १०० टक्के अयशस्वी ठरले आहे. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २८०१ वर, ११७ रुग्णांमध्ये भर

लॉकडाऊन यशस्वी झाले पाहिजे आणि निमलष्करी दलावर विचार व्हायला हवा, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे राज्यपाल धनखड आणि राज्य सरकार यांच्यात अनेकवेळा विविध मुद्द्यांवर संघर्ष झाला आहे. 

'कोरोनामुळे राज्यावर अर्थसंकट, बेरोजगारीचं प्रमाण वाढणार'

दरम्यान, पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने राज्यातील अधिक जोखमीच्या भागांसाठी काही रणनीति आखली आहे. पश्चिम बंगालमध्ये कोविड-१९ चे १४७ प्रकरणे समोर आले आहेत. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Governor Jagdeep Dhankhar furious over Mamata Banerjee for lockdown said - she should be shown the way out of power