पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यपाल नियुक्तीः भाजपाचा जातीय समीकरणं साधण्याचा प्रयत्न

आनंदीबेन पटेल यूपी तर लालजी टंडन यांना एमपीची जबाबदारी

उत्तर प्रदेशचे फगू चौहान यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करुन भाजपने पूर्वांचलमधील अति मागास जातींना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेश राजकीय कर्मभूमी असलेले चौहान हे या राज्याचे सातवे राज्यपाल आहेत. 

या नेत्यांना राज्यपाल करुन भाजपने आपले जातीय समीकरण साध्य केले आहे. त्याचबरोबर या वर्गाला आपल्याबरोबर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाला २०१७ च्या विधानसभा निवडणूक आणि नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत फायदाही मिळाला आहे. राज्यात आणि केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर येण्यात या राज्यातील या वर्गाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

उत्तर प्रदेशमधून हे आहेत राज्यपाल

६ राज्यांना नवे राज्यपाल, आनंदीबेन पटेल यूपी तर लालजी टंडन यांच्याकडे एमपीची जबाबदारी


- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह हे राजस्थानचे राज्यपाल आहेत. कल्याणसिंह हे लोधी समाजाचे मोठे नेते मानले जाते.
- राज्याचे माजी विधानसभाध्यक्ष आणि भाजपचे माजी अध्यक्ष केशरीनाथ त्रिपाठी हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. ब्राह्मण समाजावर त्यांची चांगली पकड आहे.
- अलीगडचे माजी खासदार सत्यपाल मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल आहेत. उत्तर प्रदेशमधील पश्चिम जिल्ह्यामधील ते जाट समाजाचे नेते आहेत. त्यांनी आमदार आणि राज्यसभा सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.
- आग्र्याच्या माजी महापौर बेबी राणी मौर्या उत्तराखंडच्या राज्यपाल आहेत. मागास जातीच्या बेबी राणी त्यांच्या समाजातील प्रभावशाली नेत्या आहेत.
- लालजी टंडन पूर्वी बिहारचे राज्यपाल होते. आता ते मध्य प्रदेशचे राज्यपाल असतील. टंडन हे खत्री सवर्ण समाजातून येतात.
- कलराज मिश्र यांना नुकताच हिमाचलच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांचा ब्राह्मण समाजावर विशेष प्रभाव आहे. उत्तर प्रदेशमधील ब्राह्मण चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
- फगू चौहान लोनिया चौहान या अति मागास जातीचे आहेत. या जातीचे लोक आझमगड, गाझीपूर, देवरिया, बलिया आणि जौनपूर ते वाराणसीपर्यंत मोठ्या संख्येने आढळतात. लोकसभा निवडणुकीत भाजपचा आझमगड, घोसी, जोनपूर आणि लालगंज (सु) लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे.

सिद्धू यांच्या मंत्रिपदाची अखेर, अमरिंदर सिंग यांनी राजीनामा स्वीकारला