पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्यमवर्गीयांना लवकरच सरकारकडून 'गिफ्ट', कोट्यवधी लोकांचा फायदा

आरोग्य विमा योजना (संग्रहित छायाचित्र)

देशातील गरिबांप्रमाणेच आता मध्यमवर्गीय लोकांसाठीही आयुष्यमान भारतसारखी आरोग्य योजना लागू केली जाऊ शकते. सध्या कोणत्याही सरकारी आरोग्य योजनेच्या अखत्यारित न येणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांसाठी ही योजना आणली जाऊ शकते. निती आयोगाकडून या संदर्भातील विस्तृत अहवाल तयार करण्यात आला आहे. 

दिंडीत जेसीबी घुसला, नामदेव महाराजांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू

सध्या आयुष्यमान भारत योजनेच्या चौकटीत असणाऱ्या कुटुंबांना नव्या योजनेत सहभागी केले जाणार नाही. सध्या देशातील जवळपास ४० टक्के लोक हे या योजनेच्या कक्षेत येतात. या लोकांना स्वतः पैसे खर्च करून आरोग्य विमा खरेदी करणे शक्य नाही. आता त्यापुढील वर्गासाठी आरोग्य विमा योजना लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. याचा फायदा देशातील कोट्यवधी मध्यमवर्गीयांना होऊ शकतो. 

मराठा आरक्षणः स्थगितीस नकार, जानेवारीत पुन्हा सुनावणी

निती आयोगाचे आरोग्य विषयक घडामोडींचे सल्लागार आलोक कुमार यांनी सांगितले की, देशातील ५० टक्के लोक आजही कोणताही आरोग्य विमा वापरत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून नाममात्र शुल्क घेऊन त्यांना आरोग्य विमा पुरविण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. यावर सध्या विचार सुरू आहे. त्यातही या नव्या योजनेत मध्यमवर्गाचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.