पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनचा परिणाम, देशातील १०२ शहरांतील हवेची गुणवत्ता सुधारली

 हवेची गुणवत्ता सुधारली

कोरोनाचा वाढत संसर्ग पाहता केंद्र सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडण्यासही परवानगी नाही. लॉकडाऊनचा मूळ उद्देश अजून सफल व्हायचा आहे. तत्पूर्वीच त्याचे काही चांगले परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. देशातील १०४ पैकी दोन शहरे वगळता बुधवारी सगळीकडे हवेची गुणवत्ता सुधारल्याचे दिसून आले. हवामानातील बदल आणि कोरोना विषाणूमुळे उचलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे पहिल्यांदाच देशाला शुद्ध हवा मिळाली. बुधवारी दिल्लीचा वायू गुणवत्ता सूचकांक सरासरी ७७ अंक म्हणजे समाधानकारक श्रेणीत होता.

कोरोनामुळे भारतात प्रचंड वाढतोय कंडोमचा खप

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशातील बहुतांश भागात वाहनांवर बंदी घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी मंगळवारी रात्री देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन केला असला तरी त्यापूर्वीच रस्त्यावरील वाहतूक कमी झाली होती. वातावरणात पीएम २.५ प्रदूषक कण आणि नायट्रोजन ऑक्साइडमुळे प्रदूषणात मोठी घट झाल्याचे दिसून आले. नुकताच केंद्र सरकार संचलित सफर संस्थेने मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि दिल्लीच्या प्रदूषणात झालेल्या घसरणीवर आपला अहवाल जारी केला होता. या क्रमात बुधवारी देशातील बहुतांश भागात हवेची गुणवत्ता अत्यंत चांगली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (सीपीसीबी) दररोज देशातील १०४ शहरातील वायू गुणवत्तेबाबत बुलेटिन जारी केले जाते. बुधवारी केवळ दोन शहरात वायू गुणवत्ता सूचकांक २०० अंकाच्या वर म्हणजेच खराब श्रेणीत होता. 

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर एका दिवसात मुंबई पोलिसांना आले १० हजार कॉल्स

सीपीसीबीच्या मते, लखनऊ आणि मुझफ्फरपूर येथील हवेची गुणवत्ता खराब होती. तेथील वायू गुणवत्ता सूचकांका अनुक्रमे २२० आणि २७५ असा होता. २०१ च्या वर असलेला सूचकांक खराब श्रेणीत येतो. ० ते ५० पर्यंतचा सूचकांक चांगला, ५० ते १०० पर्यंतचा सूचकांक समाधानकारक आणि १०१ ते २०० पर्यंतचा सूचकांक मध्यम श्रेणीत असतो. 

ही शहरे सर्वांत स्वच्छ

शहर/    वायु गुणवत्ता सूचकांक
लुधियाना    २७
जालंधर     ३५
कोची       ४०
पंचकूला     ४३
चेन्नई      ४६ 

देशभरात टोलवसुली बंद; नितीन गडकरींची घोषणा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:good news lockdown due to Coronavirus for the first time 102 cities of the country got clear air