पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खूशखबरः ७८ जिल्ह्यात १४ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण नाही

केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल

भारतातील ७८ जिल्ह्यात मागील १४ दिवसांत एकही कोरोना विषाणू बाधित रुग्णाचे प्रकरण समोर आले नसल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली. यामध्ये ९ राज्यातील ३३ नव्या जिल्ह्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. 

राज्यातील हॉटेल्स, खानावळींचे किचन्स सुरु करा: राज ठाकरे

दरम्यान, देशातील लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झाला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार या विषाणूविरोधातील लढ्यात देश सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. टेस्टिंगची संख्या वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पीपीई किटसह व्हेंटिलेटर आणि कोविड समर्पित रुग्णालयांची संख्याही वाढवण्यात आली आहे. 

भारतात आतापर्यंत ५ लाखांहून कोरोना टेस्ट, २१७९७ जणांना लागण

आयसीएमआरने गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत देशात कोरोनाच्या एकूण ५,००,५४२ चाचण्या झाल्याची माहिती दिली. आयसीएमआरने म्हटले की, एकूण ४,८५,१७२ व्यक्तींचे परीक्षण करण्यात आले आहे. त्यात गुरुवारी सकाळपर्यंत २१,७९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

याचदरम्यान, देशात रॅपिड टेस्टिंग रोखण्यात आले आहे. चिनी किट खराब असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रॅपिड टेस्ट रोखण्यात आले आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली. 

कोरोना संकटात प्रत्येक कुटुंबाला ७५०० रुपये मिळावेतः सोनिया गांधी

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत कोरोना संक्रमित ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांत कोरोना विषाणूची १४०० नवी प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याचबरोबर दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेशमध्येही या विषाणूचा मोठ्याप्रमाणात फैलाव झालेला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Good News in 78 Districts of india no any fresh corona positive cases found in last 14 days