पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे संपूर्ण जगात मंदीची शक्यता, भारतासाठी मात्र खूशखबर

कोरोना विषाणू (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूच्या थैमानामुळे जग मंदीच्या बाहूपाशात अडकत चालले आहे. परंतु, भारत आणि चीनसाठी मात्र या काळातही दिलासादायक वृत्त आहे. या दोन्ही देशांना इतर देशांच्या तुलनेत मंदीचा तडाखा थोड्या कमी प्रमाणात बसणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका ताज्या अहवालात म्हटले आहे की, या वर्षी कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला खर्व डॉलरचा फटका बसेल. याचा सर्वाधिक फटका हा विकसनशील देशांना बसेल. या अहवालानुसार, जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या विकसनशील देशात राहते. कोविड-१९चे संकट सर्वाधिक या देशांवर आहे. या देशांसाठी यूएनने २.५ ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या पॅकेजची घोषणा केली आहे. 

मुख्यमंत्री सहायता निधीकडे मदतीचा ओघ, दोन दिवसांत १२ कोटी जमा

संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास संमेलनाच्या (यूएनसीटीडी) नव्या विश्लेषणानुसार, संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संस्थेचा 'द कोविड-१९ शॉक टू डेव्हलपिंग कंट्रीजः टूवर्ड्स' कार्यक्रम जगातील दोन तृतीयांश लोकांसाठी आहे. येत्या दोन वर्षांत समृद्ध निर्यातक देश कमो़डिटीतून विदेशातील गुंतवणुकीतून २ ट्रिलियन ते ३ ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत घसरणीचा सामना करतील. 

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये IPL घेण्यासाठी बीसीसीआयकडून चाचपणी सुरू

यूएनसीटी़डीने म्हटले की, नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रगत अर्थव्यवस्थांबरोबर चीनने मोठ्या प्रमाणात सरकारी पॅकेजला एकत्र ठेवले आहे. जी २० प्रमुख अर्थव्यवस्था (जी २०) असणाऱ्या देशांच्या समूहानुसार, त्यांच्या अर्थव्यवस्थेत ५ ट्रिलियन डॉलरच्या जीवनरेखेचा विस्तार होईल. परंतु, या अहवालात जागतिक मंदीला भारत आणि चीन कसे अपवाद ठरतील हे विस्तृतपणे सांगितलेले नाही.

कोरोनाबाधितांचा आकडा २२५ वर, बुलढाण्यात २ रुग्ण

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Good news for India on the recession due to Corona pandemic China will also be happy with the latest UN report