पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंदिराच्या खोदकामावेळी सापडले कोट्यवधीचे सुवर्णालंकार

सोन्याचे दागिने

उत्तर प्रदेशमध्ये मंदिराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरु असताना चार किलो सोन्याचे दागिने सापडले. उत्तर प्रदेशच्या काजीपूरा गावामध्ये ही घटना घडली. सोन्याचे दागिने सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी दागिने पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

नुसती युती नव्हे महायुती! पण.. फॉर्म्युला अद्यापही गुलदस्त्यातच

काजीपूरा गावातील ग्रामस्थ मंदिर बांधण्यासाठी खोदकाम करत होते. त्याचवेळी जमिनीमध्ये एका मातीच्या भांड्यामध्ये सोन्याचे दागिने सापडले. या दागिन्यांची किंमत साधारण कोट्यवधी रुपये ऐवढी आहे. या घटनेची माहिती आसपासच्या गावामध्ये पसरताच नागरिकांनी दागिने पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

गुजरातमध्ये भाविकांची बस दरीत कोसळली; २१ जणांचा मृत्यू

पोलिसांना आणि महसूल खात्याला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करुन त्यांनी तपासाला सुरुवात केली. हे दागिने प्राचीन काळातले असल्याचे सांगितले जात आहे. या दागिन्यांमध्ये गळ्यातले दोन हार, बांगड्यायासह आणखी काही दागिने सापडले. घटनास्थळी खोदकाम सुरु आहे. मात्र अजून काही सापडले नसल्याची माहिती स्थानिक नागरिकाने दिली आहे. 

सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करु: अजित पवार