पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA: जाफराबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, गोळी लागल्याने कॉन्स्टेबलचा मृत्यू

CAA: जाफराबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, गोळी लागल्याने कॉन्स्टेबलचा मृत्यू

दिल्लीतील जाफराबादमध्ये सीएएविरोधात आंदोलन सुरु आहे. सोमवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी अनेक गाड्यांना आग लावली. यादरम्यान गोळी लागल्याने एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दिल्लीतील काही भागात आता जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

जगात भारी सचिन-विराटचे ट्रम्पही निघाले फॅन

रतनलाल असे मृत्यू झालेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. ते गोकूळपूर एसीपी कार्यालयात तैनात होते. कोणाच्या गोळीमुळे रतनलाल यांचा मृत्यू झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. 

भारताने दिलेले प्रेम मी कधीच विसरणार नाही: ट्रम्प

जाफराबादशिवाय चांद बागमध्येही आंदोलकांनी काही वाहने पेटवून दिली. सकाळी दिल्ली पोलिसांच्या सहआयुक्तांनी स्वतः नेतृत्व करत आंदोलकांना समजावून सांगण्याचे प्रयत्न केले. परंतु, आंदोलकांनी त्यांचे ऐकले नाही. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधूराचे नळकांड्या सोडल्या.

ट्रम्प यांची पत्नी, मुलगी-जावयाचे कौतुक करताना मोदी म्हणाले...

सोमवारी सकाळपासून जाफराबादमध्ये मोठ्या संख्येने पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये थोड्या-थोड्या वेळाने दगडफेक होत आहे. दगडफेकीमुळे आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:gokulpuri acp office constable ratan Lal shot dead during protest for CAA in jafrabad Delhi