पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोव्यात मंत्रीमंडळ पुनर्रचना; ४ नव्या आमदारांचा होणार शपथविधी

गोव्यात मंत्रीमंडळ पुनर्रचना होणार

गोव्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसच्या १५ पैकी १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज गोवा मंत्री मंडळाची पुनर्रचना होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मंत्रीमंडळाची पुर्नरचना करणार असून ४ मंत्र्यांना वगळून ४ नव्या आमदारांचा आज शपथविधी होणार आहे. 

चंदनपूरी घाटात दरड कोसळली; नाशिक- पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, विनोद पालयेकर, जयेश साळगावकर आणि अपक्ष रोहन खवंटे यांना मंत्रीमंडळातून वगळले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर मायकल लोबो, बाबू कवळेकर, जेनिफर बाबुश मोन्सेरात, फिलिप नेरी रॉड्रिग्स यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. तर  उपसभापतीपदी काँग्रेसमधून भाजपत आलेल्या इजिदोर फर्नांडिस यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कहर; १५ जणांचा मृत्यू तर १३३ 

दरम्यान, गोव्यामध्ये काँग्रेसच्या १५ पैकी १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या आमदारांनी दिल्लीमध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.  त्याचसोबत त्यांनी गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट देखील घेतली होती. 

निवृत्तीनंतर धोनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता