पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA संपूर्ण देशात लागू करूनच दाखवा, प्रशांत किशोर यांचे अमित शहांना प्रत्युत्तर

प्रशांत किशोर

हवी तेवढी निदर्शने करा. सुधारित नागरिकत्व कायदा कोणत्याही स्थितीत मागे घेणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितल्यानंतर लगेचच संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष आणि निवडणूक प्रचार मोहिम तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी अमित शहा यांना आव्हान दिले आहे. सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) संपूर्ण देशात लागू करूनच दाखवा, असे आव्हान प्रशांत किशोर यांनी अमित शहांना दिले. 

बळजबरीने समलिंगी संबंध ठेवल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, १४ जण अटकेत

प्रशांत किशोर यांनी बुधवारी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, लोकांचा आवाज धुडकावून लावणे म्हणजे सरकार खंबीर आहे, असे होत नाही. जे लोक सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात निदर्शने करीत आहेत त्यांची जर तुम्हाला पर्वा नसेल तर तुम्ही हे दोन्ही कायदे देशात लागू करूनच दाखवा, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

मनसे हिंदुत्वाची कास धरणार?, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ अमित शहा यांनी मंगळवारी लखनऊमध्ये एक जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी या कायद्याचे समर्थन केले. ते म्हणाले, या कायद्याविरोधात काही लोक आंदोलन करताहेत म्हणून आम्ही घाबरणार नाही. आमचा जन्मच मुळात आंदोलने सुरू असताना झाला आहे आणि आंदोलनांमध्येच आम्ही वाढलो आहोत. आम्ही विरोधी पक्षामध्ये असतानाही याचे समर्थन केले होते आणि आता सत्तेत असताना आम्ही तेच करीत आहोत.