पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मसूद अजहरच्या बहाण्याने जेटलींचा काँग्रेसवर वार

अर्थमंत्री अरुण जेटली

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करणे ही देशासाठी गौरवास्पद बाब असून भारताचा हा मोठा विजय असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले आहे. जेटली यांनी यावेळी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या प्रतिक्रियांवर खेद व्यक्त करत विरोधकांनी यालाही राजकीय रंग दिल्याची टीका केली आहे.

'भारतीय अर्थव्यवस्था २०३०पर्यंत जगात तिसऱ्या क्रमांकावर'

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करताना पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला नसल्याचे सांगत काँग्रेसने याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर जेटली म्हणाले की, या विजयात सहभागी झाल्यास त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल असे विरोधी पक्षातील काही मित्रांना वाटते. त्यामुळेच ते त्यांच्या काळात अदृश्य सर्जिकल स्ट्राइक झाल्याचे सांगत आहेत. पण जेव्हा बालाकोटमध्ये आम्ही यशस्वी झालो तेव्हा ते आमच्यावर शंका घेतात.

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे ही देशासाठी गौरवाची बाब आहे, असे सांगत विरोधकांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन जेटली यांनी केले. ते म्हणाले, देशाला १० वर्षांनंतर विजय मिळवून देण्यात आम्हाला यश आले आहे. विदेश नीती आणि सुरक्षा नीती संदर्भात आम्ही एकजूट असते अशी आमची परंपरा आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून ही परंपरा मोडीत निघण्याची प्रथा सुरु झाली आहे.

कर्जाचे हफ्ते घरभाड्यापेक्षा स्वस्त करण्याचे आमचे ध्येय - अरुण जेटली