पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चार आठवड्यांचा वेळ द्या, कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे अध्यक्षांना पत्र

विधानसभा अध्यक्ष के आर रमेशकुमार

कर्नाटकमधील राजकीय नाट्य रोज वेगवेगळे वळण घेते आहे. आता राजीनामा दिलेल्या १३ बंडखोर आमदारांनी आपली बाजू मांडण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांकडे चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. काँग्रेसचे गटनेते सिद्धरामय्या यांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांविरुद्ध सदस्यत्व रद्द करण्यासाठी विधानसभेत ठराव मांडला आहे. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी १३ बंडखोर आमदारांना नोटीस पाठविली असून, त्यांना मंगळवारीच भेटण्यास सांगितले आहे.

लवकरच एअरपोर्टवर विमानात चेक इन अवघ्या काही मिनिटांत शक्य

काँग्रेस आणि जेडीएसच्या मिळून एकूण १५ आमदारांनी बंडखोरी करीत आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे कर्नाटकमधील सरकार अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडला आहे. त्यावर गेल्या आठवड्यापासून चर्चा सुरू आहे. पण अद्याप या ठरावाववर मतदान झालेले नाही. विरोधी भाजपकडून लवकरात लवकर मतदान घेण्याची मागणी केली जात आहे. 

रमेश जारकीहोली, महेश कुमठाहल्ली, बी ए बसवराज, बी सी पाटील, प्रतापगौडा पाटील, शिवराम हेब्बर, एस टी सोमशेखर, एमटीबी नागराज, मुनिरथ्न या काँग्रेसच्या आणि के गोपालय्या, ए एच विश्वनाथ, नारायण गौडा या जेडीएसच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. आर शंकर या कर्नाटक प्रग्यावंत जनता पक्षाच्या आमदारानेही अध्यक्षांना पत्र पाठवून त्यांच्याकडे वेळ मागितला आहे.

'संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष केल्यास भाजपचीही काँग्रेस होईल'

सर्व बंडखोर आमदारांनी अध्यक्षांना पाठविलेल्या पत्राचा मसुदा एकसारखाच आहे. आमचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी मांडण्यात आलेल्या ठरावाच्या प्रती आम्हाला मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला आमचे म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ द्यावा, असे या आमदारांनी म्हटले आहे.

सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रकरणात सात दिवसांचा कालावधी देणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे, याकडेही या सदस्यांनी लक्ष वेधले.