पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोशल मीडिया सोडण्यापेक्षा द्वेष सोडा : राहुल गांधींचा मोदींना टोला

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी (ट्विटर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा विचार बोलून दाखवल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मोदीजी सोशल मीडिया सोडण्यापेक्षा द्वेष सोडा, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

PM मोदी सोशल मीडियाला 'रामराम' करण्याच्या विचारात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून सोशल मीडियापासून दूर राहणार असल्याचे संकेत दिले. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. यासंदर्भातील सविस्तर माहिती लवकरच देईन, असे ट्विट मोदींनी केले होते. त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. 

मोदींनी ट्विटच्या माध्यमातून सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिले आहेत.

मोदींच्या या ट्विटला तासाभरात ५० हजारहून अधिक लोकांनी लाइक मिळाले आहेत. तर ३२ हजार नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांचे हे ट्विट १६ हजारहून अधिक लोकांनी त्यांचे ट्विट रिट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी मोदींच्या ट्विटचा फोटो शेअर करत सोशल मीडिया सोडू नका, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी सोशल मीडिया सोडू नये, अशी प्रतिक्रिया देणारे राहुल गांधी हे पहिले नेते असून हा सल्ला देताना त्यांनी द्वेष सोडा असा टोलाही मोदींना लगावला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Give up hatred not social media accounts Congress Leader Rahul Gandhi reaction on PM narendra modi social media accounts tweet