पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यूपीमध्ये पुन्हा उन्नावसारखी घटना; बलात्कार पीडितेला जिवंत जाळले

विद्यार्थिनिला जिवंत जाळले

उन्नाव बलात्कार पीडितेला जिवंत जाळल्याची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशमध्ये अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. फतेहपूरमध्ये बलात्कार पीडित तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये तरुणी गंभीररित्या भाजली आहे. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. 

जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल

मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूरच्या हुसेनगंज भागामध्ये शुक्रवारी शेजारी राहणाऱ्या काकाने तरुणीवर बलात्कार केला. शनिवारी सकाळी पीडित तरुणीला घेऊन तिचे कुटुंबिय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात होते. त्याचवेळी आरोपीने पीडित तरुणीच्या अंगावर तेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. 

दिल्ली विधानसभेसाठी प्रशांत किशोर यांची आम आदमी पक्षाला साथ

या घटनेमध्ये पीडित तरुणी ९० टक्के भाजली आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला कानपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे फतेहपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

मी मरण पत्करेल पण माफी मागणार नाही: राहुल गांधी