पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक: बिहारमध्ये विद्यार्थिनिला घरात घुसून जिवंत जाळले

विद्यार्थिनिला जिवंत जाळले

उन्नाव बलात्कार पीडितेला जिवंत जाळल्याची घटना ताजी असताना बिहारमध्ये एका विद्यार्थिनीला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. मुजफ्फरपूरच्या अहियापूरमध्ये शनिवारी रात्री घरात घुसून एका विद्यार्थिनीला जिवंत जाळले. या घटनेमध्ये पीडित विद्यार्थिनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक भाजली आहे. तिच्यावर एसकेएमसीएच रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

उन्नाव बलात्कार प्रकरण: सात पोलिसांचे निलंबन

अहियापुर येथील नाजिरपूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित विद्यार्थिनी घरी एकटी असताना काही तरुणांनी घरात घुसून तिला जिवंत जाळले. पीडितेला जाळल्यानंतर आरोपींनीच तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल करुन फरार झाले. रविवारी तिच्या कुटुंबियांनी तिला एसकेएमसीएच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी राजा राय याला अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.  

अमृता फडणवीस अन् प्रियांका चतुर्वेदी यांच्यात जुंपली

पीडित विद्यार्थिनीच्या आईने सांगितले की, 'गावामध्येच राहणारा राजा राय त्यांच्या मुलीला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता. त्याच्या भितीमुळे पीडित विद्यार्थिनीने शिक्षण सोडून दिले होते. ती बीएचे शिक्षण घेत होती. याप्रकरणी अनेकदा अहियापुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी त्याच्याविरोधात काहीच कारवाई केली नाही. त्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिस आमच्यावरच दबाव टाकत होते.' असे त्यांनी सांगितले. 

कोल्हापूर: वाढदिवसादिवशीच ११ वीत शिकणाऱ्या तरुणीचा