आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना यावेळी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच बोलावणे धाडले आहे. नुकताच केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी गिरिराज सिंह यांनी समन्स धाडले आहे.
भारताच्या अंतर्गत प्रकरणात दखल देऊ नका, तुर्कीला ठणकावले
शाहिन बागमध्ये आत्मघातकी हल्लेखोर तयार केली जात आहेत
गिरिराज सिंह यांनी टि्वट करुन म्हटले होते की, शाहिन बाग आता फक्त आंदोलन राहिलेले नाही. तिथे आता आत्मघातकी हल्लेखोरांची टोळी बनवली जात आहे. शाहिन बागमध्ये एका महिलेचे बाळ थंडीत मरण पावले. तर ती महिला म्हणते माझा मुलगा शहीद झाला. हे आत्मघातकी बॉम्ब नाहीतर काय आहे. जर भारताला वाचवायचे असेल तर आत्मघातकी बॉम्ब, खिलाफत आंदोलन २ पासून देशाला सावध करावे लागेल.
Bharatiya Janata Party President JP Nadda summons Union Minister Giriraj Singh over his recent controversial remarks. (file pics) pic.twitter.com/hbuGLzh3Pg
— ANI (@ANI) February 15, 2020
देशात परतणाऱ्या चिनी नागरिकांसाठी कोरोनामुळे नवा नियम
देवबंद हे दहशतवादाची गंगोत्री
उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये सीएएच्या समर्थनासाठी आयोजित कार्यक्रमात देवबंद, दहशतवादाची गंगोत्री आहे, असे गिरिराज सिंह यांनी म्हटले होते. हाफिज सईदसमवेत सर्व मोठ-मोठे दहशतवादी, हे सर्व येथून तयार झाले असा आरोप त्यांनी केला होता.