पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पैसे देऊन कोणालाही सोबत घेता येते, गुलामनबी आझाद यांची टीका

गुलामनबी आझाद

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी जम्मू-काश्मीरमध्ये थांबून तेथील नागरिकांसोबत भोजन केल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी टीका केली. पैसे देऊन कोणालाही सोबत घेता येते, असे गुलामनबी आझाद यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांना अजित डोवाल यांच्यासंदर्भातील प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिले. 

अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र जाहीर होण्याची शक्यता

बुधवारी जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ येथे डोवाल यांनी सामान्य नागरिकांची भेट घेऊन तेथील सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी डोवाल यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत भोजनही केले. 'एएनआय'ने याबाबतचे छायाचित्र आणि व्हिडिओही शेअर केला आहे. यात डोवाल हे काश्मिरी लोकांबरोबर जेवताना दिसत आहेत.

पीडीपीच्या दोन खासदारांना राजीनामा देण्याचे आदेश

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले आहे. संसदेने या संदर्भातील विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात येणार आहेत. लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश असेल, तर जम्मू-काश्मीर वेगळा केंद्रशासित प्रदेश असेल. या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ghulam Nabi Azad says Paise dekar aap kisiko bhi saath le sakte ho on pictures of Ajit Doval interacting with locals in Shopian