पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीतील हवा : लोकांना गॅस चेंबरमध्ये ठेवण्यापेक्षा सरळ मारून टाका, सुप्रीम कोर्ट संतप्त

दिल्लीतील हवा प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांना मास्क लावून शाळेत जावे लागते (फोटो - राज के राज)

दिल्लीतील हवा प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सोमवारी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली आणि आसपासची राज्य सरकारे यांना झापडले. सगळं जग आपल्याकडे बघून हसतंय. तुम्ही लोकांचे आयुष्य कमी करू लागलेत. लोकांना कशाला गॅस चेंबरमध्ये राहायला भाग पाडताहात. त्यापेक्षा सरळ स्फोटके आणा आणि त्यांना एका झटक्यात मारून टाका, असे जळजळीत विधान करीत न्यायालयाने सर्वच सरकारांना फटकारले.

सिंचन घोटाळ्यातील ९ फाईल्स क्लोज, पण..

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हवेचा दर्जा खालावला आहे. हवा अतिप्रदूषित असल्याने लहान मुलांना आणि वृद्धांना आजारांना सामोरे जावे लागते आहे. सर्वसामान्यांनाही प्रदूषित हवेचा त्रास होतो आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सरकारला धारेवर धरले. या संदर्भात सरकारने दाखल केलेली प्रतिज्ञापत्रे न्यायालयाने बघितली. पण ती सर्व फक्त दुसऱ्यावर आरोप करणारी आहेत. त्यामुळे न्यायालयाने जास्त नापसंती व्यक्त केली.

'संजय राऊतांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल'

या विषयावर यापूर्वी घेतलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने पंजाब राज्याला शेतकऱ्यांकडून जाळण्यात येणाऱ्या परालीवर तातडीने अटकाव घालण्याचे आदेश दिले होते. यावेळी हरियाणामध्ये तेथील सरकारने यावर चांगले काम केले आहे. पण पंजाबमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जाते आहे. त्याचा परिणाम दिल्लीतील हवेवर होतो आहे. आता न्यायालयाने १० दिवसांत पराली जाळणे संपूर्णपणे बंद झालेच पाहिजे, अशी सक्त ताकीद राज्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.