पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ममतादीदींचा संपावर गेलेल्या डॉक्टरांना ४ तासांचा अल्टिमेटम

ममता बॅनर्जी (PTI)

पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमधील डॉक्टर सध्या संपावर गेले आहेत. संपावर गेलेल्या डॉक्टराविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सक्तीचे धोरण अवलंबले आहे. आंदोलन करत असलेल्या सर्व डॉक्टरांना ४ तासांच्या आत कामावर उपस्थितीत राहण्याचे निर्देश दिले आहेत. डॉक्टरांनी जर ऐकले नाही तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयाची पाहणी करायला गेलेल्या ममता बॅनर्जींसमोर आंदोलक डॉक्टरांनी 'आम्हाला न्याय हवाय'च्या घोषणा दिल्या.

एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी दोन कनिष्ठ डॉक्टरांवर हल्ला केला होता. त्यानंतर हल्ला करणाऱ्यांविरोधात रुग्णालयातील सर्व डॉक्टर संपावर गेले. एआरएस रुग्णालयातील आंदोलन करत असलेल्या डॉक्टरां समर्थनात बुधवारी राज्यातील सर्वच रुग्णालयातील ओपीडीचे कामकाज बंद करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. 

बंगालमधील हिंसाचाराला राज्य सरकारचं जबाबदार : गृहमंत्रालय

गुरुवारी ममता बॅनर्जी या संपामुळे रुग्णालयात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्या एसएसकेएम रुग्णालयात आल्यानंतर त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यानंतर ममतांनी सर्व डॉक्टारंना ४ तासाच्या आत कामावर परण्याच्या सूचना दिल्या. याचदरम्यान ममतांनी या संपामागे भाजप आणि डावे पक्ष असल्याचा आरोप केला.

आम्हाला आव्हान देऊ नका, ममतांचा भाजपला इशारा

दरम्यान, दुसरीकडे पश्चिम बंगालचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून डॉक्टरांच्या संपात लक्ष घालण्याची मागणी केली होती.