पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लष्कर प्रमुख जनरल रावत होऊ शकतात पहिले सीडीएस अधिकारी

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन सलग सहाव्यांदा भारतवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) हे नवे पद निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. भारतीय लष्कर प्रमुख  जनरल बिपीन रावत यांची सीडीएस म्हणून नियुक्ती केली जावू शकते, असे मानले जात आहे. 

एका वरिष्ठ अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्ती प्रक्रियेसाठी एक उच्च स्तरिय समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित समिती नोव्हेंबर २०१९ पर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे. या नव्या पदाची नियुक्ती करणाऱ्या समितीमध्ये संरक्षण सचिव, चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ सदस्यांचाही समावेश असले.  

भारत दहशतवाद्यांचे खरे चेहरे जगासमोर आणणार - मोदी

लष्कर प्रमुख जनरल रावत डिसेंबर २०१९ मध्ये निवृत्त होणार आहेत. सर्वाधिक अनुभवाच्या जोरावर त्यांची या पदावर वर्णी लागू शकते, अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. सीडीएस पदाधिकारी लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्यामध्ये समन्वयाची जबाबदारी असणार आहे. हे पद तिन्ही दलापेक्षा उच्च असेल की त्याचा दर्जा समतुल्य असेल हे अद्याप स्पष्ट नाही. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: general rawat may be the first cds panel to prepare blue print of chief of defense staff