पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीडीपी म्हणजे रामायण, बायबल नाहीः भाजप खासदार

भाजप

देशातील सध्याच्या आर्थिक मरगळीवरुन विरोधी पक्षांनी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. जीडीपीत झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मोठा गोंधळ सुरु आहे. याचदरम्यान झारखंडच्या गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी भविष्यात जीडीपीचा विशेष उपयोग नसल्याचे म्हटले आहे. आज जीडीपीपेक्षा जास्त सातत्यपूर्ण विकास महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.

शरद पवार म्हणाले मोदींनी ऑफर दिली होती, पण...

खासदार दुबे म्हणाले की, वर्ष १९३४ मध्ये जीडीपी लागू झाली. त्यापूर्वी जीडीपी नव्हते. फक्त जीडीपीलाचा बायबल, रामायण आणि महाभारत मानणे सत्य नाही. भविष्यातही जीडीपीचा जास्त काही उपयोग होणार नाही. सामान्य व्यक्तीचा आर्थिक विकास होत आहे किंवा नाही हाच आजचा नवा सिद्धांत आहे. विकासात सातत्य आहे की नाही, हेच जीडीपीपेक्षा महत्त्वाचे आहे.

यापूर्वी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपातीबाबत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापाराकडे पाहता चीनमधून कॉर्पोरेट आणि बहुराष्ट्रीय कंपन्या बाहेर पडण्याचे संकेत मिळेत आहे. त्यामुळे आम्ही त्वरीत कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केली.

नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश: CM ठाकरेंचा मोठा निर्णय