पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम 370: 'जे कुणाला जमलं नाही, ते आम्ही करून दाखवलं'

गौतम गंभीर

केंद्रामध्ये असलेल्या भाजप सरकारने सोमवारी मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला. जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आले. सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचे देशभरातील राजकीय पक्षांसह जनतेने स्वागत केले. सोशल मीडियावर तर या निर्णयाचे स्वागत करत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर याने देखील या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे.

कलम ३७० रद्द : जम्मू-काश्मीरमध्ये होणारे चार मोठे बदल

कलम 370 रद्द केल्यानंतर गौतम गंभीरने ट्विट केले आहे. त्यामध्ये त्याने असे म्हटले आहे की, जे कुणाला जमलं नाही, ते आम्ही करून दाखवलं. जम्मू-काश्मीरमध्ये आपला तिरंगा फडकला.' तर क्रिकेटपटू सुरेश रैनाने देखील ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याने असे ट्विट केले आहे की, 'कलम 370 रद्द करणे हे ऐतिहासिक पाऊल आहे.'

जम्मू-काश्मीर होणार केंद्रशासित प्रदेश; कसे बदलणार अधिकार 

केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेमध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवण्याचा प्रस्ताव सादर केला. जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्याची घोषणा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात घटना दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केले. हे विधेयक दिवसभराच्या गोंधळानंतर राज्यसभेमध्ये मंजूर झाले आहे. या विधेयकानुसार, जम्मू-काश्मीरचे दोन भागामध्ये विभाजन केले जाणार आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश होणार आहे. तर लडाख हा दुसरा केंद्र शासित प्रदेश होणार आहे. 

कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तानची चिडचिड