पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : केजरीवाल सरकारवर 'गंभीर' आरोप

गौतम गंभीर

भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर यांनी केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे. अहंकारामुळे केजरीवाल सरकारने कोरोनाच्या लढ्यासाठी योगदान म्हणून दिलेली मदत नाकरल्याचा आरोप गौतम गंभीर यांनी केलाय. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५० लाख रुपये दिले होते. पण केजरीवाल सरकार आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अंहकारामुळे खासदार निधीतून केलेली ही मदत गौण वाटली. या मदतीमध्ये ५० लाख रुपये वाढ करुन १ कोटी रुपयांची मदत देत आहे, अशी माहिती गंभीर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

कोरोना संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे, अजित पवारांचे आवाहन

दिल्लीच्या जनतेला निधी अभावी अडचणीत येऊ नये, यासाठी माझा प्राणिक प्रयत्न आहे, असे ट्विट करत गंभीर यांनी केजरीवाल सरकार विरोधात फटकेबाजी केली आहे. दिल्ली सरकार केंद्राकडून पुरेसी मदत मिळत नसल्याची नौंटकी करत आहे असा आरोप यापूर्वी गंभीर यांनी केला होता. केंद्राकडून ६५ हजार कोटी रुपयांची मदत मिळाली असतानाही केजरीवाल सरकार कोरोनाविरोधातील लढ्यात आवश्यक उपकरणांची उपलब्धता करुन देण्यात असमर्थ ठरले आहे, असेही गंभीर यांनी म्हटले आहे.  

देशातील काही भागात कोरोना तिसऱ्या टप्प्यातः एम्स संचालक

गौतम गंभीर यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की,  'मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्र्यांनी मदतीचे आवाहन केले होते. मात्र अहंकारामुळे त्यांनी माझ्या खासदार निधीतून देऊ केलेली ५० लाखांची मदत स्वीकारण्याची तयारी दाखवली नाही. परिणामी मी या रकमेत वाढ करुन आणखी ५० लाख निधी मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करत आहे. सामान्य जनतेच्या समस्या निर्माण होऊ नये, यासाठी मी हा निर्णय घेतलाय, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. 'एक कोटी रुपयांच्या मदतीमुळे मास्क आणि पीपीईची (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) तात्काळ खरेदी करणे शक्य होईल, असेही गंभीर यांनी म्हटले आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Gautam Gambhir offers Rs one crore fund to Delhi government for medical equipment mask ppe kits