पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोनाल्ड ट्रम्प येण्याआधीच आग्र्याला पोहचले गंगाजल

यमुना नदीला पाणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्या दरम्यान ते ताज महलला भेट देणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प येण्याआधीच ताजनगरी आग्र्याच्या यमुना नदीला पाणी सोडण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगनहरमार्गे यमुना नदीमध्ये ९५० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी आग्रा येथे पोहचले आहे. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले ट्रम्प सध्या  अहमदाबाद येथे दाखल झाले आहेत. 

अशी असेल ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची रुपरेषा

दरम्यान, पूर्व आगरा डीएम, आयुक्त यांनी पत्र पाठवल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर तात्काळ ५०० क्युसेक्स पाणी यमुना नदीमध्ये सोडण्यात आले. त्यानंतर मागणीनुसार आणखी ४५० क्युसेक्स पाणी यमुना नदीमध्ये सोडण्यात आले.  पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याने सांगितले की, आतापर्यंत ९५० क्युसेक्स पाणी यमुना नदीमध्ये सोडण्यात आले आहे. 

'मोदी सरकारनं केलेल्या कामाची पाहणी ट्रम्प कधी करणार?'

आग्र्याच्या अधिकाऱ्यांनी सरकार, प्रशासन आणि पाटबंधारे विभागाला पत्र पाठवत सांगितले होते की, २४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. सध्या यमुना नदीची पाणी पातळी कमी झाली आहे आणि पाण्यातून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे गंगनहरच्या माध्यमातून यमुना नदीमध्ये तीन टप्प्यांमध्ये ९५० क्युसेक्स पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. या मागणीला मेरठ पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी मान्यता दिली. त्यानंतर यमुना नदीचे पाणी सोडण्यात आले. ते पाणी आगऱ्याला पोहचले आहे. 

ISISच्या संशयावरुन कर्नाटक, तामिळनाडूत एनआयएचे २० ठिकाणी