पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबादमध्ये ६१ फुटांची भव्य गणेश मुर्ती, देशातील सर्वात उंच मुर्ती असल्याचा दावा

६१ फुटांची गणेश मुर्ती

गणेश चतुर्थीनिमित्तानं हैदराबादमधील मंडळानं ६१ फुटांची गणेश मुर्ती तयार केली आहे. ही मुर्ती देशातली सर्वात उंच मुर्ती असल्याचा दावा खैरताबाद गणेशोत्सव मंडळानं केला आहे. ही मुर्ती घडवण्यासाठी जवळपास १५० मुर्तीकार आणि कामगार चार महिने मेहनत घेत आहेत. ही मुर्ती घडवण्याचा खर्च १ कोटींच्या आसपास आहे. मुर्ती घडवण्यासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यातून कारागिर आले असल्याची माहिती या मंडळाचे अध्यक्ष मुदीराज यांनी एएनआयला दिली. 

गणपतीच्या आगमनासोबत पावसाच्याही पुनरागमनाचा अंदाज

गणेशाची मुर्ती ही 'द्वादशी आदित्य महागणपती'च्या रुपात घडवली आहे. यावर्षी देवानं चांगली पर्जन्यवृष्टी होण्याचे आशीर्वाद द्यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. या मंडळानं १९५४ साली प्रतिष्ठापना केलेल्या सर्वात पहिल्या मुर्तीची उंची ही १ फूट होती. त्यानंतर दरवर्षी गणेश मुर्तीची उंची वाढवत नेली. २०१४ साली मुर्तीची उंची ६० फूट होती. २०१४ नंतर पुन्हा मुर्तीची उंची घटवण्यात आली यावर्षी पुन्हा मंडळानं ६१ फुटांची उंची  असलेली मुर्ती घडवली असा इतिहास मुदीराज यांनी सांगितला. 

अंधेरीच्या राजासाठी डिझायनर कपडे

या मुर्तीचं वजन जवळपास ५० टन आहे. गणेश चतुर्थीला पूजा पार पडल्यानंतर भाविकांना दर्शन घेता येणार अशी माहिती त्यांनी दिली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ganesh Chaturthi 2019 a massive 61 feet high ganesh idol built in Hyderabad Claimed To Be Tallest In India