पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दिल्लीत काँग्रेसची पदयात्रा

राहुल गांधी

महात्मा गांधी यांची आज १५० वी जयंती आहे. यानिमित्ताने काँग्रेसने देशभरात पदयात्रेचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्ली येथे पत्रयात्रेचे आयोजन केले आहे. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयापासून पत्रयात्रेला सुरुवात झाली असून ही पदयात्रा राजघाटावर जाणार आहे. त्याठिकाणी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते महात्मा गांधींना श्रध्दांजली वाहणार आहेत. काँग्रेस पदयात्रेच्या समाप्तीनंतर, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना गांधीवाद आणि गांधींचे विचार असलेल्या भारतासाठी काम करण्याचे वचन देणार आहेत.महात्मा गांधी यांची आज १५० वी जयंती आहे. यानिमित्ताने काँग्रेसने देशभरात पदयात्रेचे आयोजन केले आहे.

 

वांद्र्याजवळ लोकलचे चाक रुळावरुन घसरले; हार्बर लोकलसेवा ठप्प

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या पदयात्रा काढणार आहेत. या पदयात्रेसाठी उत्तरप्रदेश सरकारने त्यांना पदयात्रेसाठी परवानगी दिली आहे. मात्र प्रशासनाने ढोल-ताशे, लाऊड स्पीकर वाजवण्यास बंदी घातली आहे. प्रियंका गांधींच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या पदयात्रेत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. लखनभ येथील शहीद स्मारक ते जीपीओ येथील गांधी पुतळ्यापर्यंतही पदयात्रा काढली जाणार आहे. 

इस्रोतील शास्त्रज्ञांची हैदरबादमध्ये हत्या