पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'काही लोकं आरएसएसला देशाचे प्रतीक बनवू इच्छित आहेत'

सोनिया गांधी

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त काँग्रेसने पदयात्रेचे आयोजन केले होते. या पदयात्रेच्या समारोपावेळी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आरएसएसवर जोरदार टीका केली. 'काही लोकं आरएसएसला देशाचे प्रतीक बनवू इच्छित आहे. मात्र हे शक्य नाही. आमचा देश गांधींच्या विचारांवर चालणारा आहे', असे सोनिया गांधी यांनी सांगितले. 

... म्हणून राज्यात शिवसेना छोट्या भावाची भूमिका निभावण्यास तयार

'महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली आहे. आज भारत ज्या ठिकाणी पोहचला आहे तो गांधींच्या विचारांमुळे पोहचला आहे. तसंच गांधीजींचे नाव घेणे सोपे आणि मात्र त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे कठिण आहे', असे सोनिया गांधी यांनी सांगितले आहे. 

वांद्र्याजवळ लोकलचे चाक रुळावरुन घसरले; हार्बर लोकलसेवा ठप्प

तसंच, 'महात्मा गांधींच्या विचारांना हटवून आपल्या मार्गाने घेऊन जाणारे कमी नव्हते. गेल्या अनेक वर्षांमध्ये साम-दाम-दंड-भेदाचा खुला कारभार करुन ते स्वत:ला खूप सामर्थ्यवान समजत आहेत. तरी सुध्दा भारत भरकटला नाही. कारण आपला देश गांधीच्या विचारांवर चालणार आहे.', असे म्हणत सोनिया गांधी यांनी भाजपवर टीका केली.

 इस्रोतील शास्त्रज्ञांची हैदरबादमध्ये हत्या

दरम्यान, 'आजकाल काही लोकांनी गांधींचे विचार उलटे करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना वाटते की गांधीजी नाही तर आरएसएस देशाचे प्रतीक बनले पाहिजे. मात्र असे होणार नाही. जे असत्यावर आधारित राजकारण करत आहे त्यांना कसे कळणार की गांधी सत्याचे पुजारी होते. ते सत्तेसाठी सर्वकाही करायला तयार आहेत.' असा आरोप सोनिया गांधींनी आरएसएसवर केला आहे. 

ट्विटर डाऊन, नेटकऱ्यांची तक्रार