पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

G7 Summit 2019 : काश्मीरच्या पार्श्वभूमीवर मोदी-ट्रम्प भेटीला महत्त्व

मोदी-ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

फ्रान्समध्ये आयोजित जी  ७ परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बियारित्झमध्ये पोहचले. याठिकाणी पोहचताच मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्राने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

ट्रम्प म्हणाले, काश्मीरमध्ये स्थिती कठीण, पण चर्चा चांगली झाली

सात विकसित श्रीमंत देशांच्या या जी-७ समुहात  फ्रान्स, जर्मनी, युके, इटली, अमेरिका, कॅनडा आणि जापान या राष्ट्रांचा समावेश आहे. या परिषदेत सहभागी होण्यापूर्वी मोदींनी फ्रान्स, संयुक्त अरब अमीरात आणि बहरीन या तीन देशांचा दौरा केला. काश्मीर मुद्याशिवाय पर्यावरण,  आणि डिजिटल क्षेत्रातील बदलासंदर्भातील जागतिक स्तरावरील अन्य ज्वलंत मुद्यांच्या पार्श्वभूमीवर मोदी इतर राष्ट्रांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत. 

काश्मीरच्या मुद्यावर मोदी-ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर भारत- पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. आता पाकिस्तानसोबत चर्चा होईल ती फक्त पाकव्याप्त काश्मीरबाबत, अशी भूमिका यापूर्वी भारताने मांडली आहे. ही चर्चादेखील काश्मीर खोऱ्यातील आणि भारतात इतरत्र पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी कारवाया थांबल्या तरच होईल. असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काश्मीरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्रम्प यांच्याशी याच माध्यमातून संवाद साधला होता. यावेळी भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधासोबतच मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे जी परिषदेमध्ये ट्रम्प-मोदी यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.