पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर जपानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणाले...

नरेंद्र मोदी आणि शिंझो आबे

जी २० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यात गुरुवारी द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेच्या सुरुवातीलाच शिंझो आबे यांनी लोकसभा निवडणुकीत इतक्या प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा निवडून आल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी त्यांनी आता भारत दौऱ्यावर येण्याची वेळ माझी आहे आणि मी या दौऱ्यासाठी खूप उत्सुक आहे, असे शिंझो आबे यांनी म्हटले आहे.

आयात करात भारताने केलेली वाढ अस्वीकारार्ह, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट

जपानमधील ओसाकामध्ये आजपासून तीन दिवस जी २० शिखर परिषद होते आहे. या परिषदेत युरोपीय युनियनसह एकूण १९ देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होत आहेत. मानव केंद्री भविष्यातील समाज हा यंदाच्या परिषदेचा प्रमुख विषय आहे.

शिंझो आबे यांनी अभिनंदन केल्यावर नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शिंझो आबे यांनी सर्वात आधी मला फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या, ही आठवणही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:g 20 updates japan pm shinzo abe once again hearty congratulations to pm modi for an overwhelming win in elections