पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जी २० शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी जपानला पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये

जपानमधील ओसाकामध्ये होणाऱ्या जी २० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानला पोहोचले आहेत. बुधवारी रात्रीच नरेंद्र मोदी नवी दिल्लीहून जपानसाठी रवाना झाले आहेत. जलवायू परिवर्तनपासून ते दहशतवादापर्यंत विविध मुद्द्यांवर नरेंद्र मोदी या परिषेदत विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करतील.

या शिखर परिषदेवेळी नरेंद्र मोदी फ्रान्स, जपान, इंडोनेशिया, अमेरिका आणि तुर्की या देशांशी द्विपक्षीय चर्चासुद्धा करणार आहेत. तसेच या परिषदेवेळी ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या प्रमुखांची बैठकही होणार आहे.

नरेंद्र मोदी जी २० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानला पोहोचले असल्याचे एएनआयने म्हटले आहे. या परिषदेला रवाना होण्यापूर्वी ट्विटच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, जगातील इतर देशांच्या प्रमुखांसोबत प्रमुख आव्हानांवर चर्चा करण्यासाठी मी उत्सुक आहे. महिलांचे सशक्तीकरण, डिजिटलीकरण या विषयांवर आम्ही या बैठकीत चर्चा करणार आहोत. नरेंद्र मोदी यांनीही एक ट्विट करून ओसाकामध्ये पोहोचल्याचे जाहीर केले.