पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेपाळमध्ये बस उलटली; जखमींमध्ये कर्नाटक, महाराष्ट्रातील प्रवाशांचा समावेश

नेपाळमध्ये बस उलटली

भारतीय प्रवाशांनी भरलेली एक भरधाव बस सोमवारी सकाळी नेपाळमधील व्यास नगरपालिमा येथे उलटली. या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले. यात १२ हून अधिक जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी पोखरो येथील मणीपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रपतींच्या विमानाला ३ तास उशीर झाल्यावर सविस्तर चौकशीचे आदेश

प्रवाशांनी भरलेली ही बस मुक्तीनाथ धामकडे जात होती. भरधाव बसवरील चालकाचा ताबा सुटला आणि बस उलटली. तंहुचे पोलिस उपअधिक्षक लीलाराज यांनी या बसमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रवासी असल्याचे सांगितले. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरुन पसार झाला.