पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नीरव मोदीला दिलासा नाहीच, लंडनमध्ये जामीन अर्ज फेटाळला

नीरव मोदी

पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा लंडनमधील कारागृहातील मुक्काम वाढला आहे. वेस्टमिनिस्टर न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिला आहे. त्याची पोलिस कोठडी २४ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी पुढील सुनावणी होईल. यापूर्वी २९ मार्चमध्येही न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. 

शुक्रवारी लंडनमध्ये नीरव मोदीच्या जामीन अर्जाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आली. न्यायाधीश एम्मा अबर्थनॉट यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली आणि पोलिस कोठडी वाढवण्याचा निर्णय दिला. 

दुसरीकडे, भारतात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीच्या १२ जप्त कारची विक्री केली. ईडीच्या वतीने एमएसटीसीने १३ आलीशान कारचा लिलाव बोलावला होता. यातील १२ कारचा लिलाव झाला. यातून ३.२९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

नीरव मोदी मागील वर्षी जानेवारीमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याचा पर्दाफीश होण्यापूर्वीच भारतातून पळून गेला होता. बँकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन त्याने तब्बल १३ हजार कोटी रुपयांचा चुना लावला होता.