पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीर आणि लडाख आज मध्यरात्रीपासून वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश

जम्मू-काश्मीर आणि लडाख दोन नवे केंद्रशासित प्रदेश असणार

ऑगस्ट महिन्यात संसदेमध्ये मंजूर झाल्यानुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर जम्मू-काश्मीरचा वेगळ्या राज्याचा दर्जा जाणार असून, या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन होणार आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्त्वात येणार आहेत. गुरुवार, ३१ ऑक्टोबरपासून हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश कार्यरत होतील.

भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

केंद्र सरकारने जी सी मुरमू यांची जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. ते गुजरातमधील सनदी अधिकारी आहेत. राधाकृष्ण माथूर यांची लडाखच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा असणार नाही. या प्रदेशाचा कारभार थेट केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नायब राज्यपालांच्या माध्यमातून बघितला जाईल. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा असणार आहे. त्यामुळे दिल्लीप्रमाणेच विधानसभा, नायब राज्यपाल यांच्या माध्यमातून जम्मू-काश्मिरचा कारभार चालणार आहे.

'बाप रे!, समुद्राच्या पाणी पातळीत वाढीचा मुंबईला मोठा धोका'

विशेष म्हणजे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी हे नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्त्वात येत आहेत, हे विशेष. ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तो मंजूरही केला होता.